उमरी शहरात यंदाची नवरात्र भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करून दाखवणार, असा निर्धार KD Boss यांनी व्यक्त केला आहे.
उमरी शहरात यंदाची नवरात्र भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करून दाखवणार, असा निर्धार KD Boss यांनी व्यक्त केला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष उपक्रम आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, यंदाची नवरात्र उमरीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी नवरात्र ठरवण्याचा संकल्प असल्याचे KD Boss यांनी म्हटले आहे.
“उमरीतील महिलांनी आतापासूनच तयारीला लागावे; यंदाची नवरात्र आपण सर्वजण मिळून दणक्यात साजरी करू,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यामुळे उमरीतील महिलांमध्ये नवरात्रोत्सवाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, KD Boss नेमकं काय भव्य आयोजन करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








