भोकर शहरात दूध-दह्यात भेसळीचा संशय! अन्न सुरक्षा अधिकारी गप्प का? कारवाई कधी होणार? भोकर उपविभागीय कार्यालयासमोर राहुल कोंडेलवार यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू! मुख्य संपादक: विजयकुमार मोरे कोळी पाटील वार: मंगळवार | दिनांक: 27/10/2026 भोकर भोकर | 26 ऑक्टोबर 2026 Nanded live 24 दिनांक: 25 Oct 2026 ऑटो व्यवहारातील 30 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भोकर पोलिसांत गुन्हा दाखल ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्सव साजरी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कै. किसानराव पांचाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त खुर्च्यांचे वाटप भोकर तालुका बांधकाम कामगारांच्या लेबर कार्ड नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी

भोकर–नांदेड रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार, ८ जखमी

भोकर–नांदेड रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार, ८ जखमी
भोकर (प्रतिनिधी) – भोकर ते नांदेड मार्गावरील सिताखंडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक वाहनाची भीषण धडक होऊन ६ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना उपचारासाठी नांदेड येथील विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मॅजिक वाहन क्रमांक एमएच २६ ए.के. ०५४८ हे नांदेडहून भोकरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी ट्रक क्रमांक एपी २९ पीए ८१२९ हा भोकरकडून नांदेडकडे येत होता. सिताखंडी परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
धडक एवढी भीषण होती की, मॅजिक वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अपघातात पांडूरंग लिंगुजी वाघमारे (५५), रा. सय्यदनगर, भोकर, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग पवार, तसेच शेख फेरोज (३०), रा. बिलालनगर, भोकर आणि शेख अलतमेश शेख अलीमोद्दीन (२५), रा. बिलालनगर, भोकर, बलवान पवार, रा. पोटा तांडा यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. अन्य एका मृताचे नाव अद्याप समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मृतांची व जखमींची अधिकृत माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें