भोकर शहरात दूध-दह्यात भेसळीचा संशय! अन्न सुरक्षा अधिकारी गप्प का? कारवाई कधी होणार? भोकर उपविभागीय कार्यालयासमोर राहुल कोंडेलवार यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू! मुख्य संपादक: विजयकुमार मोरे कोळी पाटील वार: मंगळवार | दिनांक: 27/10/2026 भोकर भोकर | 26 ऑक्टोबर 2026 Nanded live 24 दिनांक: 25 Oct 2026 ऑटो व्यवहारातील 30 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भोकर पोलिसांत गुन्हा दाखल ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्सव साजरी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कै. किसानराव पांचाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त खुर्च्यांचे वाटप भोकर तालुका बांधकाम कामगारांच्या लेबर कार्ड नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी

Nanded live 24 दिनांक: 25 Oct 2026 ऑटो व्यवहारातील 30 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भोकर पोलिसांत गुन्हा दाखल

Nanded live 24 दिनांक: 25 Oct 2026
ऑटो व्यवहारातील 30 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या
दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भोकर पोलिसांत गुन्हा दाखल
भोकर तालुक्यातील दिवशी येथील तुळशीराम लक्ष्मण कदम (वय ४५) यांनी ऑटो व्यवहारातील पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भोकर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मयत तुळशीराम लक्ष्मण कदम यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचा ऑटो विकला होता. या व्यवहारातील उर्वरित ३० हजार रुपये वारंवार मागूनही पैसे देण्यास टाळाटाळ करून उलट जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा त्रासाला कंटाळून तुळशीराम कदम यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये दोन्ही आरोपींची नावे लिहून ठेवली होती.
त्या चिठ्ठीमध्ये माझा ऑटो १ लाख रुपयाला विकला आहे. उर्वरित ३० हजार रुपये पंधरा दिवसांत देण्याचे ठरले होते. पाच महिने लोटून गेले असतानाही पैसे न देता उडवाउडवीची भाषा करीत आहेत. ज्याने काय झाले ते करून घे, यासह मारण्याची धमकी देत आहेत, असे लिहून होते.
मयत तुळशीराम कदम यांच्या पत्नी करुणाबाई तुळशीराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मैदीन शेख आणि राहुल माधव सोनकांबळे दोघेही रा. भोकर यांच्याविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(v) अन्वये संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें