हिमायतनगर शहरातील बांधकाम कामगारांच्या लेबर कार्ड नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत हिमायतनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना बांधकाम कामगारांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम कामगारांचे लेबर कार्ड दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र, लेबर कार्ड नूतनीकरणासाठी नगरपंचायत कार्यालयाकडून आवश्यक असलेली काही कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक कामगारांच्या लेबर कार्ड नूतनीकरणाची मुदतही संपलेली आहे.
बांधकाम कामगार हा कष्टकरी वर्ग असून शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी लेबर कार्ड नूतनीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच, अधिकृत बांधकाम कामगारांना आवश्यक कागदपत्रांसाठी वारंवार कार्यालयात यावे लागू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर हिमायतनगर शहरातील बांधकाम कामगारांच्या स्वाक्षऱ्या असून, ते आवक-जावक विभाग, नगरपंचायत हिमायतनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
कष्टकरी बांधकाम कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वृत्तांकन








